9 September 2020

EPS-95 Employees Pension (1995) Co-Ordination Committee Letter to CBT Members by Prakash Pathak

 


आ .श्री पाठक सा  नमस्कार .दि 08।09।2020 चे आपण सन्माननीय श्रम मंत्री व  सी .बी .टी .प्रतिनिधींना लिहलेले पत्र वाचले .समन्वय समिती प्रत्येक आघाडी वर आपले निवेदन देवून आपल्या ज्येष्ठ eps निव्रुत्त वर्गाच्या व्यथा मांडत आहे हे प्रशंसनीय आहे .परंतु सन्दर्भला अनुसरून जर पत्र व्यवहार झाला तरच त्याचे औचीत्य असते असे माझे व्यक्तिगत मत आहे .उदा . दि 09 ।09। 2020 ची सभा श्रम मंत्रालयाने सी बी टी  प्रतिनिधी बरोबर चर्चे करिता बोलवीली आहे , हे आपले दुर्दैव की देशातील राष्ट्रीय कामगार संघटना आपल्या विषया च्या बाबतीत अगदी दुजा भाव ठेवत आहे .(आपण त्याचा स्पष्ट संदर्भ दिला आहे )
प्रश्न हा आहे की या सभेत ह्या पत्राची दाखल घेतल्या जाईल काय ???
आपण आपल्या घटनात्मक अधिकाराची मागणी योग्य पटला समोर करीत आहो काय ? ? ? 
असे ऐकिवात आहे की ही सभा eps 95 च्या कायद्या मध्ये दुरुस्ती करिता आयोजित आहे 
आणि हे जर खरे असेल तर epfo व श्रम मंत्रालय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पुनर्विचार याचीकेचा आग्रह का करिते .
तरीसुद्धा लोकशाही मध्ये  आपले विचारात अभिव्यक्त करायचा आपला घटनात्मक हक्क आपण वापरतो आहो व  कोविड 19 च्या  परिस्थितीत आपल्या जवळ जास्त पर्याय नाही हे ही सत्य आहे 
सर्व सामन्यांच्या माहिती साठीच का नसे समिती आपले प्रयत्न अव्यहात ठेवत आहे हे पण कमी नव्हे .


0 comments:

Post a Comment

 
close