10 October 2020

निवृत्त वीज कर्मचारी मित्रहो,कोरोनामुळे जसे कोर्ट बंद आहे अंशदायी पेन्शन योजना 1995

 निवृत्त वीज कर्मचारी मित्रहो,कोरोनामुळे जसे कोर्ट बंद आहे अंशदायी पेन्शन योजना 1995


 निवृत्त वीज कर्मचारी मित्रहो 


कोरोनामुळे जसे कोर्ट बंद आहे , तसें संवाद कमी झालाय की काय असे वाटू शकते. मात्र तसें अजिबात नाही. 

मी आपल्या संघटनेच्या हिताच्या दृष्टीने आणि पेन्शनच्या कोर्ट केस निमित्ताने सतत काही ना काही करत असतो. मात्र त्या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत नाही कारण निवृत्त कर्मचारी आज फक्त पेन्शनची केस केव्हा उभी रहाते आणि निकाल आपल्या बाजूने केव्हा एकदा लागतो , याच बातमीच्या आशेवर आहे आणि मला त्याची कल्पना आहे

आज मला अंशदायी पेन्शन योजना 1995 अजिबात मिळत नाही. मी स्वतः नागपूर जिल्ह्यातील असलेल्या माझ्या जमिनीवर काम करतो आणि आरोपित वीज  कर्मचाऱ्याचा कायदेशीर  सल्लागार अशी  कामे करतो. त्यातून थोडेफार अर्थार्जन होते त्यात मी शेतीची आर्थिक व्यवस्था करतो. निवृत्तीपूर्वी मी एच आर म्हणजेच सा प्र वि या विभागात प्रदीर्घ काळ  काम केले असल्याने आणि कायद्याचाही अभ्यास केलेला असल्याने या बी आर 624 कोर्टकेससाठी सामाजिक भावनेने काम करीत आहे. असे काम करताना अनेकदा अडचणी येतात. क्वचित प्रसंगी आपलेही  कुणीतरी टीका करतात.मात्र  तिकडे दुर्लक्ष करून मी काम सतत करत आहे. हे काम मी  एकटा करू शकत नाही. तुमच्यासारखे काही निवृत्त कर्मचारी व अधिकारी या पेन्शनच्या कामामुळे एकत्र जोडले गेले आहेत. चतुर्थ श्रेणीपासून मुख्य अभियंता आणि संचालक या पदावरून निवृत्त झालेले सर्वजण आज स्वेच्छेने आपल्या सोबत आहेत. त्या सर्व सन्माननीय सदस्यांचा विश्वास आणि प्रेम हीच  माझी ताकत आणि प्रेरणा आहे, म्हणजेच संघटनेची ताकद आहे. तुमच्यामुळेच मी मानसिक दृष्ट्या खंबीर झालो आहे. तुम्हा सर्वांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. 

कोरोनामुळे जरी आपली केस काही काळ खंडित झाली असली तरी या सप्टेंबरअखेर किंवा 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत नागपूर हायकोर्टात हे काम होईल असा अंदाज आपले वकिलांनी सांगितला आहे ही आपल्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. मी आपल्या वकिलांना सांगितले आहे की कोर्ट रजिस्ट्रारना  भेटून आपली कोर्टकेस शक्य तितक्या लवकर सुनावणी साठी घेण्याबाबत विनंती करावी.

आपल्या केससाठी योग्य त्या कागदपत्रासह आणि पुराव्यासह आपला लेखी युक्तिवाद तयार आहे. मात्र हे  युक्तिवादाचे मुद्दे गोपनीय ठेवणे आवश्यक आहे म्हणून ते या माहितीमध्ये दिले नाही. आपण सर्वांनी विश्वास ठेवावा एवढेच मी सांगू सांगू इच्छितो महत्त्वाचे म्हणजे या संघटनेला जोडले गेलेल्या अनेक जुन्या निवृत्‍त कर्मचार्‍यांनी त्यांच्या मित्रपरिवारात मेसेज देऊन आणि बी आर  624 बद्दल थोडक्यात माहिती देऊन अनेक नवीन सदस्य आणि त्यांना पेड मेंबरशिप देऊन रुपये पाचशे (रु 500/फक्त) आजीवन वर्गणी देण्याची विनंती केल्याने ते वर्गणी स्वखुशीने आपल्या संघटनेच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करीत आहे तसेच फेसबुकच्या  माध्यमातून दत्तात्रेय पाटे पुणे यांनी सुद्धा पुन्हा पुन्हा याविषयी माहिती दिल्याने रोज नवीन सदस्य जोडले जात आहेत  आणि वर्गणी व देणगी जमा करत आहेत. 

सन्माननीय सदस्य मित्रहो या कामात अजून बरेच सदस्य येणे आवश्यक आहे. कारण भविष्यात जर पेड मेंबरशिप किती आहे असा प्रश्न जर कोर्टाने विचारला तर संघटने मार्फत मा.न्यायालयाचे समाधान होईल इतपत सदस्य संख्या दाखविणे आवश्यक आहे. सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे 30000 आहेत यापैकी दहा टक्के जरी सदस्य संख्या आपण दाखवू शकलो तरी पुरेसे आहे. त्यासाठी प्रत्येक सदस्यांनी थोडाफार हातभार लावणे गरजेचे आहे. नवीन इच्छुक लोकांनी त्यासाठी  संपर्क साधल्यास या पेन्शनची आणि कोर्टकेसची  अद्ययावत  माहिती दिली जाईल.

!! एक नम्र विनंती !!


आपण सध्या जमा करत असलेल्या वर्गणीची माहिती सर्वसाधारण वार्षिक बैठकीमध्ये देत असतो. मात्र काही निवृत्त कर्मचारी उत्सुकतेपोटी ग्रुपवर किंवा वैयक्तिकरित्या विचारणा करत असतात. त्यांना सांगण्यात येते की असे प्रश्न आणि शंका याबद्दलची माहिती  पुढील सर्वसाधारण वार्षिक बैठकीत दिली जाईल मात्र सध्या अशी माहिती विचारू नये. सर्व जमा रक्कम  (सदस्यता फी  व देणगी रक्कम )आपल्या संघटनेच्या  बँक खात्यात मुदत ठेवी या रूपात ठेवत आहोत आणि त्याची एकही रुपयाही  मीटिंग,  दौरे, स्टेशनरी,  चहापाणी किंवा जेवण यासाठी अजिबात खर्च केला जात नाही. संपूर्ण कारभार पारदर्शक आहे. कारण आर्थिक  व्यवस्थापन  विश्‍वसनीय आहे एवढी खात्री बाळगावी. 

सर्व सदस्याचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.


 आशा आहे की दिवाळीपूर्वी कोरोनाचा प्रभाव फार कमी झाला असेल आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले असतील.  आपल्या पेन्शन बद्दलही काहीतरी चांगली बातमी नक्कीच हाती आली असेल. 


घरी राहा सुरक्षित रहा.


आपला स्नेहांकित 

साहेबराव चरडे, 

अध्यक्ष विद्युत मंडळ निवृत्त कर्मचारी संघ, 

केंद्र नागपूर

0 comments:

Post a Comment

 
close