10 June 2021

पेन्शनर बंधुंनो, भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेवर सुप्रसिद्ध वकील श्री. महेश जेठमलानी यांची एका रिक्त जागेवर खासदार म्हणून नेमणूक केली आहे.

 पेन्शनर बंधुंनो,

सप्रेम नमस्कार. 

                   नुकतेच भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेवर सुप्रसिद्ध वकील श्री. महेश जेठमलानी यांची एका रिक्त जागेवर खासदार म्हणून नेमणूक केली आहे.

                  सरकारकडून अनेक क्षेत्रातील नामवंतांना राज्यसभेवर नियुक्त केले जाते. सदर नामवंतांचा आदर, गौरव म्हणूनच त्यांना खासदार म्हणून राज्यसभेवर घेतले जाते,असे वाटते.

                  अशा नियुक्त राज्यसभा खासदारांकडून लोकहिताची किंवा जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याची फारशी भरीव कामगिरी झालेली दिसत नाही,असो

                 आपण शासनाकडे EPS.95ची पेन्शनवाढ करा,किंवा त्यामध्ये सुधारणा करा अशी मागणी अनेक राजकारणी पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून करीत आहोत. पण प्रत्यक्षात फारच थोड्या लोकांनी मागण्यांचा विचार करून राज्यसभेत किंवा संसदेत आवाज उठविला आहे. प्रमाण अत्यल्पच आहे.

                 साधारण 15 लाख मतदारांमागे एक खासदार निवडून येतो. आपण तर 65 ते 70 लाख पेन्शनर आहोत. वरील प्रमाणामध्ये आपल्यामधून कमीत कमी 5 खासदार संसदेत जाऊ शकतात. पण वास्तवामध्ये हे अशक्य आहे.

                   म्हणूनच आपले प्रतिनिधित्व करणारा प्रामाणिक निस्वार्थी ,तळमळीचा राष्ट्रहित डोळ्यापुढे ठेवून पेन्शनरांचे प्रश्नांचा वारंवार पाठपुरावा करणारे प्रतिनिधी राज्यसभेत असले पाहिजेत असे वाटते. त्यासाठी सर्व पेन्शनर, समन्वय समिती,नेते मंडळीनी मा. पंतप्रधान किंवा राजकीय पक्षाच्या माध्यमातून राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे आवश्यक वाटते.

                    मार्ग खडतर आहे पण किमान आपली मागणी पुढे रेटली पाहिजे. तसा प्रयत्न तरी करणे गरजेचे आहे. म्हणजे कधीतरी मा. प्रकाशजी पाठक,

मा. प्रकाशजी येंडे,मा.भिमराव डोंगरे यासारख्या प्रामाणिक नेत्यांचे न्याय मिळवायचे स्वप्न तरी पुरे हो हि प्रामाणिक इच्छा.

                                  कळावे,

                       आपला विश्वासू ,

                   श्री.अरूण मार्डीकर 

1 comment:

  1. The Eight-Wheel Classic - TITIAN Arts
    The titanium metal trim eight-wheel classic bicycle is available in six 바카라 사이트 sizes. aprcasino.com The Bicycle Wheel is a classic kadangpintar bicycle made in USA, but there are three variations herzamanindir.com/ in

    ReplyDelete

 
close