28 September 2021

स्वाभिमानाने जगता येईल एवढ्या पेंशनची मागणी : ईपीएस ९५

स्वाभिमानाने जगता येईल एवढ्या पेंशनची मागणी 


 "स्वाभिमानाने जगता येईल एवढ्या पेंशनची मागणी "

   शहादा(नंदुरबार) दि.२१/९/२०२१ :- ईपीएस ९५ अंतर्गत येणाऱ्या १८६ विभागातील निव्रुत्त कर्मचाऱ्यांना स्वाभिमानाने जगता येईल एवढे निव्रुत्तीवेतन देण्यात यावे अशी कळकळीची मागणी आज रोजी ईपीएस९५ निव्रुत्ती कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री प्रकाशजी येंडे व ऊपाध्यक्ष मा.श्री पुंडलीकजी पांडे यांनी शहादा (जि.नंदुरबार) येथे निव्रुत्त कर्मचारीसाठी आयोजित केलेल्या सभेत  केंद्र सरकारकडे मागणी केली.श्री येंडे सो. यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे श्री पांडे साहेब व नागपूर हायकोर्टाचे माजी एडव्होकेट श्री गोविंदभाई पाटील ,जिल्हाध्यक्ष श्री धामणे यांचे ऊपस्थितीत करण्यात आली.व राष्ट्रीय पातळीवरील चाललेल्या हालचाली बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

     प्रथम तालुका अध्यक्ष श्री के.डी.गिरासे व ऊपाध्यक्ष श्री भालेराव साळुंखे व सदस्य रामजी भाई यांचे हस्ते शाल ,बुके देवून सत्कार  पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. 

      नुकतेच श्रममंत्री मा.श्री भुपेंद्रजी यादव यांनी अध्यक्ष, ऊपाध्यक्ष, व राजस्थान राज्यातील संघटनेच्या प्रतिनिधींना दि.१ सप्टेंबर२०२१ रोजी दिल्ली येथे निमंत्रित करून मागण्याविषयी सकारात्मक चर्चा केली व येणार्या काळात चांगला निर्णय घेतला जाईल  असल्याचे सांगून आश्वासन दिले व पुन्हा आक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात भेट घेणार असल्याचे सांगितले.

   सभेस शहादा, नंदुरबार, तळोदा, नवापूर, विसरवाडी,दोंडाईचा येथील असंख्य कर्मचारी ऊपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन श्री शरद पाटील यांनी केले व आभार श्री भालेराव साळुंखे यांनी केले.व सभेची सांगता करण्यात आली.

0 comments:

Post a Comment

 
close