14 November 2021

सोलापूर येथील सोलापूर श्रमिक पत्रकार संघ पार्क या ठिकाणी निवृत्त कर्मचारी (1995) समन्वय समिती विभाग सोलापूर वतीने पत्रकार परिषद संपन्न

 सोलापूर येथील सोलापूर श्रमिक पत्रकार संघ पार्क या ठिकाणी निवृत्त कर्मचारी (1995) समन्वय समिती विभाग सोलापूर वतीने  पत्रकार परिषद संपन्न  


नमस्कार मित्रांनो 
काल दि 12/11/21 रोजी सोलापूर येथील सोलापूर श्रमिक पत्रकार संघ पार्क या ठिकाणी निवृत्त कर्मचारी (1995) समन्वय समिती विभाग सोलापूर वतीने  पत्रकार परिषद संपन्न  झाली यावेळी सचिव इंजि शशिकांत ठोकळे यांनी याच तारखेला ●निषेध दिन ● का पाळणार आहोत तसेच या तुटपुंज्या पेन्शन बाबत व संघटनेच्या 2007 पासूनचा संघर्ष व वाटचाल 
    सन 1971च्या योजने नंतर ईपीएस 1995 योजनेचे रूपांतरण या योजनेचे वास्तव काय आहे 
पेन्शन फंडात जमा रक्कम 
आजपर्यंत एक रूपयाची वाढ केली नाही.

 मा कोशीयारी कमेटी अहवाल क्र.147 लागू करण्यात केवळ मध्यवर्ती कार्यकारिणीचे योगदानामुळे कसा आणला त्याच्या शिफारसी काय आहेत.
4/10/16 चा मा सुप्रीम कोर्टाचा निकाल सविस्तर माहिती व केंद्र सरकारने फेरयाचिका का दाखल करून आमचे विरोधात कसे आहे.राज्य,केंद्र  सरकारच्या व ईपीएस पेंशन मध्ये किती फरक हेही समजावून सांगितले 
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना युगांडा यांचे कडे कैफियत दाखल केली आहे आसल्याची माहिती दिली 
संघटना देशभरात एकाच वेळी एकाच दिवशी निषेध दिनी मोर्चा काढून निवेदन देणार आहेत सोलापूर व महाराष्ट्रातील पेन्शनधारकाची किती आहेत ती संख्या नमूद केली
यावेळी कार्याध्यक्ष इंजि अशोक कोंडगुळे यांनी मा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हायर वेतनावर पेन्शन दिलेली कशा प्रकारे केंद्र सरकारने बंद केली याची सविस्तर माहिती दिली 
ही पत्रकार परिषद एक तासपर्यंत चालु होती 
  या प्रसंगी मा अध्यक्ष हरिभाऊ नरखेडकर,कार्याध्यक्ष इंजि  अशोक कोंडगुळे,संघटक दत्तात्रय जामदार व पूर्व विभागाचे अध्यक्ष मा दंडी हजर होते 
अध्यक्ष हरिभाऊ नरखेडकर
 उपाध्यक्ष दिलावर मनेरी
 कार्याध्यक्ष अशोक कोंडगुळे 
संघटक  मा दत्तात्रय जामदार 
पर्व विभाग अफप


0 comments:

Post a Comment

 
close